माझी संपत्ती नाही तर कर्ज वाढले , निलेश लंके म्हणाले उद्या निवडून आलो तरी.. 

शेअर करा

आमदार पदावर काम करत असताना आपण विविध योजनेअंतर्गत गावोगाव निधी उपलब्ध करून दिले आणि विकास कामांचे जाळे उभे केले. छोट्या छोट्या गावांमध्ये कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला. रस्ते पुल वीज आरोग्य यासह अनेक कामे पूर्ण करून पारनेर मतदारसंघ एका वेगळ्या उंचीवर नेलेला आहे , असे निलेश लंके यांनी म्हटलेले आहे. 

निलेश लंके यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आपल्याला मतदान करण्याचे आवाहन मतदारांना केले त्यावेळी ते म्हणाले की , ‘ पारनेर मतदार संघासाठी मी अहोरात्र परिश्रम घेतलेले आहेत मात्र समोरचा उमेदवार हा आपल्या तालुक्यातील नाही. उद्या मी खासदार झाल्यानंतर पारनेर अशीच ओळख सांगणार आहे. आपल्या माणसाची आपल्याच माणसाला काळजी वाटणार आहे हे नेहमी लक्षात ठेवा.

मी निलेश लंके नेहमी समाजासाठी जगलोय , स्वतःसाठी कधीच काही मागितले नाही. मतदार संघासाठी दिवस रात्र झटलो निधी उपलब्ध केला. काही आमदारांचे कारखाने बंगले झाले माझी संपत्ती नाही तर कर्ज वाढले , असेही ते यावेळी म्हणाले. 


शेअर करा