धनंजय मुंडे लायकी नसलेला माणूस , त्यांना कशा कशातून बाहेर काढलं सांगितलं तर.. 

शेअर करा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांना लायकी नसलेला माणूस असे वक्तव्य केलेले आहे . राष्ट्रवादीत फूट पडली त्यावेळी धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्यासोबत गेले. महाराष्ट्राच्या कृषिमंत्री पदाची जबाबदारी त्यांच्यावर सध्या असून धनंजय मुंडे काही दिवसांपूर्वी करुणा मुंडे प्रकरणात ते चांगलेच अडचणीत आलेले होते. तत्कालीन भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी धनंजय मुंडे यांच्यावर अनेकदा टीका केली मात्र धनंजय मुंडे अजित पवार यांच्यासोबत भाजप गोटात गेल्यानंतर त्यांच्यावरील टीका देखील बंद झालेली आहे. 

धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्याबद्दल बोलताना , ‘ तुम्ही पुलोद सरकार स्थापन केलं ते संस्कार आणि अजित पवार जर महायुतीसोबत गेले तर ते गद्दार. शरद पवारांनीच भाजप सोबत चर्चा केलेल्या होत्या आणि शिवसेनेला बाजूला ठेवण्याचे म्हटलेले होते. ही निवडणूक भावकी भाऊबंदकीची नाही देशाचा पंतप्रधान ठरवण्याची निवडणूक आहे , ‘ असे धनंजय मुंडे म्हणाले. 

शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना , ‘ धनंजय मुंडे म्हणजे लायकी नसलेला माणूस त्यांना कशाकशातून बाहेर काढले हे जर सांगितलं तर त्यांना बाहेर फिरणं मुश्किल होईल.  एकंदरीत त्यांनी केलेले उद्योग आणि इतर गोष्टींबद्दल मी आता बोलू इच्छित नाही. एका लहान कुटुंबातला तरुण म्हणून त्याला हाताला धरून विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी दिली. पक्षातील लोक नाराज होते तरीही जबाबदारी दिली मात्र आता ते माझ्यावर वैयक्तिक हल्ले करू लागले आहेत कुटुंबावर हल्ले करत आहेत. त्यांच्याबद्दल मी आज जे बोललो ते शेवटचं यापुढे बोलणार नाही, असेही शरद पवार म्हणाले. 


शेअर करा