अहमदनगर येथील जिल्हा न्यायालयात पुन्हा वकिलावर हल्ला,  काल संध्याकाळी.. 

शेअर करा

अहमदनगर येथील जिल्हा न्यायालयात काम करणारे ज्येष्ठ वकील अशोक कोल्हे यांच्यावर काल संध्याकाळी पाचच्या सुमारास हल्ला करण्यात आला. सदर हल्ला हा जिल्हा न्यायालयाच्या आवारात झालेला असून त्यांच्याच पक्षकाराने हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे . अशोक कोल्हे यांना त्यानंतर झोपडी कॅन्टीन परिसरातील एका खाजगी रुग्णालयात हलवण्यात आलेले असून कोल्हे यांच्यावरील हल्ल्याचा सर्वत्र निषेध केला जात आहे. 

राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते अभिषेक कळमकर आणि दादाभाऊ कळमकर यांनी घटनास्थळी भेट देऊन या घटनेचा निषेध व्यक्त केलेला असून वकिलांवर होत असलेले हल्ले हे चिंतनीय बाब आहे असे म्हटलेले आहे . शहरातील कायदा सुव्यवस्थेवर देखील त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले असून लवकरात लवकर पोलीस प्रशासनाने आरोपीला अटक करावी अशी मागणी केलेली आहे.


शेअर करा