ध्रुव राठी पाकिस्तानी अन बायकोच नाव जुलेखा ?, सोशल मीडियावर केला खुलासा की.. 

शेअर करा

युट्युबवर ध्रुव राठी सध्या माहित नाही असा व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. ध्रुव राठीच्या व्हिडिओला लाखो लोक पाहतात त्याचा चाहता वर्ग असून गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या आयटीसेलची त्याने पोलखोल केली सोबतच कशा पद्धतीने नागरिकांना धार्मिक द्वेषात ढकलले जात आहे याविषयी व्हिडिओ बनवलेला होता त्यानंतर सोशल मीडियावर चक्क ध्रुव राठी मुस्लिम असल्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. आपल्या व्हिडिओला उत्तर देण्यासाठी कुठलाच आधार नाही त्यामुळे असे व्हिडिओ व्हायरल केले जात असल्याचे त्याने म्हटलेले आहे. 

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये ध्रुव राठी हा मुस्लिम असल्याचा दावा केला जात असून त्याचे खरे नाव बद्रुद्दीन रशीद लाहोरी आणि त्याची पत्नी जुली हे पाकिस्तानी आहेत असे म्हटलेले आहे. जुलीचे खरे नाव जुलेखा आहे आणि ध्रुव राठी आणि ती दाऊद इब्राहिमच्या कराचीमधील बंगल्यात पाकिस्तानी लष्कराच्या सुरक्षित राहत आहे असाही मेसेज सध्या सोशल मीडियात व्हायरल केला जात आहे. सुरुवातीला एक तथाकथित शत्रू स्वतःहून उभा करायचा आणि जो कोणी आपल्या विचारांना विरोध करेल त्याला त्याच्यासोबत जोडायचे असे एका राजकीय आयटीसेलचे कारनामे पुन्हा एकदा समोर आलेले आहेत. 

ध्रुव राठी हा 2013 पासून सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडिओ बनवतो. सुरुवातीला त्याने राजकीय विषयांवर व्हिडिओ बनवले मात्र त्यातील बहुतांश विषय हे जुने होते सद्य  परिस्थितीवर नव्हते त्यामुळे त्याला फारसा असा विरोध झाला नाही मात्र देशातील परिस्थिती पाहिल्यानंतर त्याने वस्तूस्थितीवर व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्याला देशद्रोही तसेच मुस्लिम ठरवण्याचे उद्योग सुरु झाले. 

ध्रुव राठी सध्या जर्मनीमध्ये राहत असून 1994 साली त्याचा जन्म झालेला आहे. त्याचे कुटुंब हे मूळचे हरियाणातील रोहतकचे असून ध्रुव राठीचे बालपण आणि शिक्षण हे दिल्लीमध्ये झालेले आहे . पुढील शिक्षणासाठी तो जर्मनीला गेला आणि पारंपारिक हिंदू पद्धतीने त्याने जर्मन तरुणीशी विवाह देखील केला. सद्य परिस्थितीत भाजपच्या राजकारणाची त्याने पोलखोल केली त्यानंतर त्यासंदर्भात असे व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल केले जात आहेत. 


शेअर करा