मनमाड रोडवरील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी महिला आली पण ‘ झालं असं ‘ की ..

शेअर करा

नगर शहरात एक खळबळजनक अशी घटना सावेडी परिसरात उघडतील घडलेली असून कार पार्किंग करण्याच्या वादातून एका महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्याचा प्रकार मनमाड रोडवर समोर आलेला आहे. दहा तारखेला अपेक्स हॉस्पिटलसमोर ही घटना घडलेली असून चार जणांच्या विरोधात तोफखाना पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, साहिल वाकळे, अब्बास उर्फ शुभम वाकळे, साहिल वाकळेची आई आणि बहीण अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे असून श्रीरामपूर येथील महिलेने त्यांच्या विरोधात तक्रार दिलेली आहे. सदर महिला ही आजारी असल्याकारणाने हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेली होती त्यानंतर तिने तिची कार हॉस्पिटल शेजारी असलेल्या बाबा सर्विस सेंटर समोर असलेल्या एका झाडाखाली उभी केली त्यावरून फिर्यादी आणि सदर महिला यांच्यात वाद झाला आणि त्यानंतर त्याचे रूपांतर हाणामारीत झाले.

महिलेने म्हटल्याप्रमाणे आरोपी साहिल वाकळे याने महिलेच्या पोटावर लाथ मारली आणि त्यामध्ये ही महिला जखमी झालेली असून खाजगी रुग्णालयात तिने उपचार सुरू केलेले आहेत. रात्री नऊच्या सुमारास ही फिर्याद दाखल करण्यात आली आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आरोपींचा शोध घेतला मात्र नेहमीप्रमाणे प्रकरण पोलिसात जाताच आरोपी फरार झाल्याचे या प्रकरणात देखील दिसून आलेले आहे.


शेअर करा