निर्लज्जपणाचा कळस..’ इस्लामचा अपमान ‘ म्हणत मित्र-मैत्रिणीला घेरलं अन..: व्हिडीओ

शेअर करा

मध्यप्रदेशातील इंदोर इथे एक खळबळजनक घटना समोर आली असून जेवणासाठी मुस्लीम तरुणीबरोबर गेलेल्या ब्राह्मण तरुणाला अडवून धक्काबुक्की करण्यात आलेली आहे . त्याला मदत करणाऱ्या दोन जणांना भोसकण्यात आले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलेले आहे. सदर घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून धर्मांध टोळी या मुलीला इस्लामचा हवाला देऊन दमदाटी करत असल्याचे दिसून येत आहे . तिच्यासोबत असलेला तरुण हा ब्राह्मण कुटुंबातील असल्याचे टोळक्यातील एक जण सांगतो सोबतच तो ‘ मारू नका ‘ असे देखील आवाहन सुरुवातीला करत आहे . विशेष म्हणजे ही मुलगी तिच्या घरच्यांना सांगून बाहेर पडलेली होती.

नेमकं प्रकरण काय ?

२६ मे रोजी इंदोर येथील एक ब्राह्मण तरुण आपल्या मुस्लीम मैत्रिणीसह जेवणासाठी गेला होता मात्र जेवण करून बाहेर आल्यानंतर जमावाने दोघांना घेरलं. यानंतर जमावाने तरुणीला जाब विचारत तरुणाला देखील धक्काबुक्की केली. व्हायरल व्हिडीओत एक व्यक्ती तरुणीला खडसावत आहे. “तू हिजाब घातला आहे तरीही तू इस्लामचं पालन करत नाही. इस्लामचा अपमान करू नको,” असं तो व्यक्ती तरुणीला म्हणत आहे . भररस्त्यात असा प्रकार समोर आल्याने संताप व्यक्त केला जात आहे तर सोबतचा तरुण घाबरून गेलेला आहे .

अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेश रघुवंशी यांनी सांगितलं की, “तरुणी तिच्या पालकांना सांगून तरुणाबरोबर जेवायला आली होती. जमावाच्या गैरवर्तणुकीवरही तरुणीने आक्षेप घेतला असून तसेच मध्यस्थी पडलेल्या दोन व्यक्तींवरही चाकूने वार करण्यात आले आहेत ‘ असे म्हटलेले आहे . धर्मांध टोळीला असा अधिकार कोणी दिला ? यावर संताप व्यक्त केला जात असून धर्माच्या ठेकेदारांचे असे प्रकार बंद होणे तात्काळ गरजेचे आहे .


शेअर करा