निलेश राणेंच्या कानाखाली वाजवा अन एक लाख मिळवा , राष्ट्रवादीकडून ऑफर

शेअर करा

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर अत्यंत खालच्या स्वरूपात टीका करायची . त्यांचे मनोधैर्य खच्ची करण्यासाठी भाषेची पातळी ओलांडायची आणि काहीही बरळत राहायचे असा प्रकार भाजपच्या नेत्यांकडून केला जात असून निलेश माजी खासदार निलेश राणे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची चक्क औरंगजेबाशी तुलना केलेली होती. त्या विरोधात नागपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बाबा गुजर यांनी निलेश राणे यांच्या कानाखाली वाजवा आणि एक लाख रुपये मिळवा अशी ऑफर दिलेली आहे.

निलेश राणे यांनी निवडणुका जवळ आल्यानंतर , ‘ शरद पवार यांना मुस्लीम समाजाचा पुळका येतो जणूकाही औरंगजेबाचाच पुनर्जन्म झाल्यासारखे वाटते ‘ असे वादग्रस्त ट्विट केलेले होते. निलेश राणे यांनी याआधी देखील अत्यंत खालच्या पातळीत राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका केलेली आहे त्यामध्ये रोहित पवार यांचा देखील समावेश आहे. बाबा गुजर यांनी निलेश राणे यांच्या कानाखाली वाजवण्याची वेळ आलेली आहे आणि त्यासाठी आपण एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केलेले आहे असे म्हटलेले आहे.

राज्यातील अनेक शहरांमध्ये गेल्या सहा महिन्यांच्या आत वेगवेगळ्या पद्धतीने धार्मिक वातावरण चिघळवण्याचे प्रकार होत असून जून महिन्यातच नगर कोल्हापूर ,बीड ,अंमळनेर या ठिकाणी असे प्रकार समोर आलेले आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकारावर देखील धार्मिक भावना भडकवणारेच वक्तव्य केलेले असून गृहमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीने जबाबदारीचे भान ठेवणे गरजेचे आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील जाणीवपूर्वक सत्ताधारी व्यक्तींकडून अशा पद्धतीचे वातावरण बनवण्यात येत आहे असे म्हटलेले आहे . महाराष्ट्रातील सर्व बहुतांश उद्योग गुजरातला पळवले असल्याने महाराष्ट्रातील जनतेला निवडणुकीला सामोरे कसे जायचे याची चिंता असल्याने भाजपच्या कथित बी टीमकडून हे प्रकार केले जात असल्याची चर्चा आहे.


शेअर करा