जुन्या मनपाला अनिलभैय्यांचे नाव , किरण काळेंसोबत 25 जणांवर गुन्हे दाखल

शेअर करा

नगर शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी जुन्या महापालिकेला स्वर्गीय अनिलभैय्या राठोड यांचे नाव दिल्यानंतर त्यांच्यासोबत सुमारे 25 जणांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . किरण काळे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून याबद्दल माहिती दिलेली आहे .

नगर शहरात विक्रमी काळ आमदारकी भूषवलेले स्वर्गीय अनिल भैय्या राठोड यांच्याबद्दल आजही प्रत्येक नगरकरांच्या मनात आदराचे स्थान आहे . शिवसेनेचे सर्वात जुने विश्वासू आणि ठाकरे कुटुंबीयांशी जवळीक असलेले लोकप्रिय नेते अशी अनिलभैया राठोड यांची ओळख होती . त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या नावाने शहरात काहीतरी असावे या भावनेतून काँग्रेसने देखील अनेकदा अशा स्वरुपाची मागणी केलेली आहे. किरण काळे यांच्या नेतृत्वात हा प्रकार करण्यात आला आणि त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.


शेअर करा