शरद पवारांना धमकी देण्यासाठी तरणाबांड तरुण बनला ‘ नर्मदाबाई पटवर्धन ‘

शेअर करा

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना नुकतीच सोशल मीडियावरून ‘ तुमचा दाभोळकर करू ‘ अशी धमकी देण्यात आलेली होती. पोलिसांनी या प्रकरणी पुण्यात सागर बर्वे नावाच्या एका व्यक्तीला ताब्यात घेतलेले असून धक्कादायक बाब म्हणजे सागर बर्वे हा चक्क नर्मदाबाई पटवर्धन या फेक नावाने वावरत होता आणि त्याने शरद पवार यांना धमकी दिली होती. आरोपी तरुणाचे कुठलीही राजकीय कनेक्शन पोलिसांना सापडलेले नाही मात्र त्याने धमकी देण्याचे कारण देखील तितकेच विचित्र समोर आलेले असून नैराश्यातून त्याने हा प्रकार केला असल्याचे त्याने म्हटले आहे .

सागर बर्वे हा चक्क इंजिनियर असून गेल्या काही वर्षांपासून त्याचे लग्न जमत नाही त्यामुळे तो तणावात आहे अशातच महाराष्ट्रात औरंगजेबाच्या फोटोवरून शरद पवार यांच्यावर काहीही कारण नसताना संताप व्यक्त करत त्याने त्यांना धमकी दिलेली होती. सोशल मीडियावर असे अनेक फेक अकाउंट असून या अकाउंटच्या माध्यमातून विशेषतः भाजपला प्रश्न विचारणाऱ्या किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणाऱ्या व्यक्तींना टार्गेट करण्यात येत आहे. अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू असून आरोपी सागर बर्वे याने शरद पवार यांना धमकी देण्यामागे आपला कुठलाही हेतू नव्हता असे म्हटले आहे मात्र तो राजकीय पक्षाच्या आयटी सेलचा भाग आहे का ? याचाही तपास सुरु आहे .

दुसरीकडे सौरभ पिंपळकर नावाच्या आणखीन एका व्यक्तीने शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केलेली होती त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी आमचा याच्याशी काही संबंध नाही असे देखील म्हटलेले होते मात्र सौरभ पिंपळकर याच्यासोबत भाजप नेते चंद्रकांत बावनकुळे यांचे काही फोटो सोशल मीडियात व्हायरल झालेले आहेत त्यावरून देखील हा भाजपचा कट असल्याचा आरोप करण्यात येत आहे. सोशल मीडियावर भिन्न विचारसरणी असणाऱ्या नागरिकांना अत्यंत खालच्या पातळीत शिव्या देऊन त्यांना त्रास देणे असे प्रकार बहुतांश उजव्या विचारसरणीशी संबंधित असलेल्या व्यक्तींकडून करण्यात येत असून आपल्यावर कारवाई होणार नाही याचा अंदाज असल्याने असे प्रकार करण्यात येत आहेत .


शेअर करा