..म्हणून फक्त मृगजळाच्या मागे धावलो , घनश्याम शेलार म्हणाले की.. ?

शेअर करा

नगर जिल्ह्यातून राष्ट्रवादी पक्ष सोडून बीआरएस पक्षात गेल्यानंतर घनश्याम आण्णा शेलार यांची भाषा बदललेली पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी पक्षात एकनिष्ठेने तब्बल 23 वर्ष घनश्याम शेलार यांनी काम केलेले होते. शरद पवार यांनी बीआरएस आणि वंचित बहुजन आघाडी हे दोन्ही पक्ष भाजपची बी टीम असल्याचा आरोप अनेकदा केलेला आहे. काँग्रेसच्या मतपेढीला धक्का लावण्यासाठी भाजपने असे छोटेखानी पक्ष उभे केलेले आहेत अशी टीका अनेकदा भाजपवर होत असते सोबतच एमआयएमवर देखील बी टीम असल्याचे आरोप होत असतात.

घनश्याम अण्णा शेलार म्हणाले की, ‘ राष्ट्रवादी पक्षात आपण गेली 23 वर्षे प्रामाणिकपणे काम केले . शरद पवार यांचे कृषीविषयक धोरण जे आहे त्याच्या अगदी उलट धोरण पक्षातील लोक राबवतात आणि पक्षात बेईमान लोकांचा सध्या भरणा होत आहे त्यामुळे सध्या पक्ष राजकीय दृष्ट्या अस्थिर झालेला आहे. वरिष्ठांकडे अशा व्यक्तींच्या विरोधात अनेकदा तक्रारी केल्या मात्र पक्ष त्यांच्यावर काहीही कारवाई करत नाही. प्रामाणिकपणे पक्षात काम करणाऱ्यांची कदर केली जात नाही .

14 जून रोजी आपण राष्ट्रवादीतून बाहेर पडलेलो आहोत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे शेतकऱ्याविषयी अत्यंत स्पष्ट धोरण होते मात्र पक्षातील अनेक नेते त्यांच्या या धोरणाच्या विरोधातच भूमिका घेतात. अनेक कारखानदार असलेले नेते शेतकऱ्यांची देणी देत नाहीत. एफआरपी प्रमाणे शेतकऱ्यांना पेमेंटही देत नाहीत. पक्षातील नेत्यांकडून अशा स्वरूपाचे वर्तन असल्याकारणाने आपण अनेकदा वरिष्ठांकडे तक्रार केल्या मात्र तक्रारी केल्या मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. राष्ट्रवादी पक्ष शेतकऱ्यांचा कल्याणकारी पक्ष होईल या आशेने अनेक वर्ष आपण मृगजळाच्या मागे धावत होतो मात्र आता वास्तविक आशेचा किरण बीआरएसच्या माध्यमातून आपल्याला सापडलेला आहे. महाराष्ट्रात आणि देशातही बीआरएस पॅटर्न लागू व्हावा अशी आपली इच्छा आहे.


शेअर करा