नगरच्या ‘ ताबा पॅटर्न ‘ विरोधात उद्धव सेना उतरणार रस्त्यावर , तीस तारखेला..

शेअर करा

नगर चौफेरने काही महिन्यांपूर्वीच नगरमध्ये मोकळे पडलेले प्लॉट यावर गुंडांचा डोळा असून अशा प्लॉटवर दमदाटी करत ताबा घेण्याचे प्रकार सुरू असल्याचे वृत्त दिलेले होते. नगरी भाषेत त्याला ‘ ताबा बसवणे ‘ असे म्हटले जात असून काही विद्यमान लोकप्रतिनिधींच्या टोळक्यांकडून असे प्रकार केले जात आहेत. गुंडांच्या टोळ्यांकडून बेकायदेशीर ताबे घेतले जात असल्याने आता शहरात राजकीय वर्तुळात देखील संताप व्यक्त केला जात असून बोगस मालक उभे करून खरेदीखत बोगस केली जात आहेत आणि याला शासकीय अधिकाऱ्यांचे पाठबळ मिळत आहे असा दावा ठाकरे सेनेच्या युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड यांनी एका पत्रकार परिषदेत केलेला आहे.

विक्रम राठोड यांच्यासोबत पत्रकार परिषदेमध्ये माजी महापौर भगवान फुलसौन्दर, अभिषेक कळमकर , बाळासाहेब बोराटे ,दत्ता जाधव ,गिरीश जाधव योगीराज गाडे ,अशोक दहिफळे यांच्यासोबत इतरही अनेक राजकीय पदाधिकारी उपस्थित होते. तीन-चार वर्ष सलग पाणीपट्टी कोण भरत नाही अशा व्यक्तींची माहिती महापालिका अधिकाऱ्यांकडून घेऊन त्यानंतर अशा जागांचे ताबे घेण्याचे प्रकार शहरात वाढल्याचे विक्रम राठोड आणि अभिषेक कळमकर यांनी सांगितलेले आहे.

ज्या व्यक्तींच्या जागा बेकायदेशीरपणे बळकवण्यात आलेले आहेत त्यांनी उद्धव ठाकरे शिवसेनेच्या चितळे रोडवरील मुंजोबा चौकात कार्यालयात संपर्क साधावा . या सर्वांना घेऊन 30 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे असे देखील विक्रम राठोड यांनी म्हटलेले आहे. रामेश्वर कलवार आणि उषाबाई लोंढे या व्यक्तींनी देखील आपली जागा परस्पर बळकवलेली आहे त्याला न्यायालयाची स्थगिती आहे मात्र स्थानिक गुंडांनी त्यावर कब्जा केलेला आहे असे म्हणत आपली कैफियत पदाधिकाऱ्यांसमोर सादर केलेली होती . तीस जून रोजी नगरमध्ये याच्या विरोधात मोर्चा काढला जाणार आहे.


शेअर करा