घर दाखवण्याच्या बहाण्याने शेजारणींवर बलात्कार , विवाहिता म्हणतेय की..

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक असा प्रकार पालघर इथे समोर आलेला असून नालासोपारा परिसरात घर दाखवण्याच्या बहाण्याने एका घरी घेऊन जात महिलेवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. सदर प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केलेली असून आरोपी आणि पीडित महिला हे शेजारी राहत होते आणि तीन वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. महिलेचे लग्न झालेले असून ती तिच्या पतीसोबत आरोपीच्या घराशेजारी राहते.

उपलब्ध माहितीनुसार, आकाश विठ्ठल सकपाळ असे आरोपी व्यक्तीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे. महिलेसोबत त्याची तीन वर्षांपासून ओळख होती आणि याच ओळखीतून त्याने तिला घर दाखवण्यासाठी बाहेर नेलेले होते. तिथे गेल्यानंतर त्याने तिच्यावर एकापेक्षा अधिक वेळा बलात्कार केला आणि या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ काढले. कुणाला काही सांगितले तर हे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची देखील त्याने धमकी दिली त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केलेली आहे.

आरोपी आकाश याने या महिलेचे फोटो आणि व्हिडिओ काढल्यानंतर तिच्या नवऱ्याला ठार करण्याची आणि हे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिलेली होती. पीडित महिलेने सगळा प्रकार तिच्या पतीला सांगितला आणि त्यानंतर दोघेही पती पत्नी पोलीस ठाण्यात आले आणि आकाश याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.


शेअर करा