खाजगी कंपनीत वसुली करणाऱ्याचीच नियत फिरली , शिर्डीत गुन्हा दाखल

शेअर करा

फसवणुकीचा एक अजब प्रकार शिर्डी इथे समोर आलेला असून भारत फायनान्शियल इंक्लुजन या कर्ज वितरित करणाऱ्या खाजगी कंपनीमध्ये वसुली करणाऱ्या व्यक्तीने सुमारे तीन लाख रुपयांचा अपहार केलेला आहे. शिर्डी पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, सदर कंपनी ही परिसरात कर्ज वितरणाचे काम करत असते. अनेक नागरिकांना कंपनीने कर्ज पुरवलेले असून या कर्जाच्या वसुलीसाठी कार्तिक बाबासाहेब राजगुरू ( राहणार जैतखेडा कन्नड जिल्हा औरंगाबाद ) या व्यक्तीवर जबाबदारी सोपवण्यात आलेली होती . नवीन सदस्य जोडणे ,त्यांना कर्ज वाटप करणे ,कर्जाचे हप्ते गोळा करणे अशी जबाबदारी त्या व्यक्तीवर होती मात्र गेल्या काही दिवसांपासून कार्तिक हा कामावर येत नव्हता त्यामुळे अखेर कंपनीची गैरसोय होऊ लागली आणि कंपनीने कृष्णा बाबासाहेब आंधळे नावाच्या व्यक्तीवर ही जबाबदारी सोपवली.

कृष्णा यांनी वसुलीला सुरुवात केली त्यावेळी ते शिर्डी परिसरात फिरू लागले तेव्हा त्यांना कर्जदारांनी आपण ही रक्कम आधीच दिलेली आहे असे समजले मात्र कार्तिक राजगुरू यांनी ही रक्कम कंपनीच्या खात्यात जमा केली नाही आणि स्वतःच्या हितासाठी या पैशाचा वापर केला. प्रकरण लक्षात आल्यानंतर शिर्डी शाखेचे व्यवस्थापक असलेले कंपनीचे अधिकारी समीर रशीद शेख ( वय 25 राहणार शिर्डी ) यांनी पोलिसात फिर्याद दिलेली असून कार्तिक राजगुरू यांच्या विरोधात कलम 406 , 409 आणि 420 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे


शेअर करा