आईला बोलावून आण म्हणून सांगितलं अन काही क्षणात.., राहुरीतील घटना

शेअर करा

नगर जिल्ह्यात राहुरी शहरात एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून जुन्या बसस्थानकाजवळ बालाजी मंदिराशेजारी भाड्याने राहत असलेल्या एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. मयत व्यक्तीचे वय 46 वर्ष असून ते श्रीरामपूर येथील मूळचे रहिवासी आहेत.

उपलब्ध माहितीनुसार , जगदीश जनवेजा ( वय 46 ) असे मयत व्यक्ती यांचे नाव असून 11 जून रोजी ही घटना घडलेली आहे . त्यांची पत्नी कामाला गेलेली असताना घरामध्ये मुलगी आणि वडील हे दोघेच होते त्यावेळी वडिलांनी तिला तुझ्या आईला कामावरून बोलाव असे सांगितले म्हणून मुलगी घराबाहेर गेलेली होती त्याचवेळी ही घटना घडलेली असून पत्नी आली त्यावेळी हा प्रकार समोर आलेला आहे. राहुरी पोलिसात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.


शेअर करा