धर्मांतरासाठी चक्क ‘ मालिश ‘ मसाज , काष्टीत तीन महिला ताब्यात

शेअर करा

नगर जिल्ह्यात एक धर्मांतराचा अजब प्रकार समोर आलेला असून श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी इथे एका गरीब कुटुंबाला वेगवेगळी आमिष दाखवत ख्रिश्चन धर्मात प्रवेश करा. तुमच्या मुलांची लग्न होतील. घरातील समस्या दूर होतील असे सांगून धर्मांतर करण्यासाठी बळजबरी केल्याप्रकरणी तीन महिलांना पोलिसांनी अटक केलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, नम्रता वेंकटेश वारणसे ( वय 27 राहणार पानसरे वस्ती तालुका दौंड ), शारदा आकाश सौंदंडे ( वय 27 राहणार विघ्ने वस्ती तालुका दौंड ), वैशाली सुनील पवार ( वय 36 राहणार विघ्ने वस्ती तालुका दौंड ) अशी अटक केलेल्या महिलांची नावे असून प्रकाश मदरे ( वय वीस राहणार काष्टी श्रीगोंदा ) यांनी याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी परिसरात मदरे हे त्यांची आई आणि भावासोबत राहत असून शनिवारी सकाळी दौंड येथील वरील तिन्ही महिला मद्रे यांच्या घरी आलेल्या होत्या त्यावेळी त्यांनी ख्रिश्चन धर्मात प्रवेश करा असे सांगत धर्माबद्दलची माहिती देण्यास सुरूवात केली आणि आमच्या धर्मात आलात तर तुमच्या मुलांची लग्न होतील तुमच्या सगळ्या अडचणी दूर होतील असे देखील त्यांनी सांगितले.

आरोपी तिन्ही महिलांनी तक्रारदार यांच्या आईच्या कपाळावर तेल लावून धर्मांतर करण्यासाठी जबरदस्ती केली आणि प्रार्थना म्हटली त्यावेळी तक्रारदार व्यक्ती यांच्या आईने आम्हाला धर्म बदलायची इच्छा नाही असे सांगितल्यानंतर देखील त्या धर्मांतरासाठी त्यांना बळजबरी करू लागल्या. आमच्या देवाची प्रार्थना केली नाही तर तुमचे वाईट होईल असे देखील त्या म्हणाल्या त्यानंतर मात्र तक्रारदार व्यक्ती यांनी सामाजिक कार्यकर्त्यांना याप्रकरणी माहिती दिली आणि पोलिसांनी महिलांची चौकशी करताच संशयास्पद बाबी आढळल्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आले. आरोपी महिलांनी अशाच पद्धतीने इतरत्र देखील किती नागरिकांना भीती दाखवत धर्मांतराचे आमिष दाखवले होते याचा देखील आता पोलीस तपास करत आहेत .


शेअर करा