लग्नाला सहाच महिने झाले होते अन .. , कुटुंबावर शोककळा

शेअर करा

एक अत्यंत दुर्दैवी अशी घटना बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात समोर आलेली असून तालुक्यातील कोल्हेवाडी गावचे सुपुत्र असलेले उमेश नरसू मिसाळ हे भारतीय सैन्य दलात कार्यरत असताना राजस्थान येथील सुरतगड येथे देशसेवा बजावत असताना त्यांना विजेचा शॉक बसला आणि त्यात त्यांचा मृत्यू झालेला आहे. अवघ्या सहा महिन्यांपूर्वी त्यांचा विवाह झालेला होता.

उमेश नरसू मिसाळ हे भारतीय सैन्य दलात कार्यरत होते. 25 मराठा लाईट इन्फंट्री बटालियन इथे कर्तव्य बजावत असताना 26 जून रोजी त्यांना वीरमरण आलेले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ते दोन वर्षांपूर्वी भारतीय सैन्य दलात भरती झालेले होते. सैन्यात भरती झाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांपूर्वी त्यांनी केकानवाडी येथील प्रतीक्षा यांच्यासोबत विवाह केलेला होता. सोमवारी सकाळी परेडसाठी जात असताना भूमिगत वीज वाहिनीतून त्यांना धक्का बसला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला .

शहीद जवान उमेश मिसाळ यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आलेले असून संपूर्ण गावात त्यांच्या मृत्यूची वार्ता येताच शोककळा पसरलेली आहे . लग्नाला अवघे सहा महिने झाल्यानंतर असा झालेला दुर्दैवी अपघात प्रत्येकाच्याच मनाला चुटपुट लावून गेलेला आहे.


शेअर करा