मराठा आरक्षणासाठी आणखी एकाचे टोकाचे पाऊल , अकरावीत शिकत असताना

शेअर करा

सध्या मराठा आरक्षणाचा विषय चांगलाच गाजलेला असून हिंगोली जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात एका मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांने शैक्षणिक फी भरू शकला नाही म्हणून आत्महत्या केलेली आहे. महाविद्यालयात शिकत असताना घरची परिस्थिती हालाखीची असल्याकारणाने त्याने विष प्राशन करून स्वतःचे आयुष्य संपवलेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार , परमेश्वर चितरे ( वय सतरा वर्ष ) असे त्याचे नाव असून हिंगोली जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील दवडगाव इथे वडील विठ्ठल चितरे यांच्यासोबत तो राहतो. चित्रे यांना पाच मुली आणि दोन मुले असून सतरा वर्षांचा परमेश्वर चित्रे हा छत्रपती संभाजीनगर इथे अकरावी वाणिज्य शाखेत शिकत होता.

परमेश्वर याने 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 च्या सुमारास स्वतःच्या शेतामध्ये विष प्राशन करून आत्महत्या केली. महाविद्यालयाचे शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी त्याने पैशाची मागणी केलेली होती मात्र वडिलांनी सोयाबीनची काढणी झाल्यानंतर भरू असे सांगितले मात्र फी भरण्यास उशीर होत असल्याकारणाने त्याने टोकाचे पाऊल उचलले असे त्याच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आलेले आहे.

परमेश्वरचे वडील विठ्ठल चितरे यांनी याप्रकरणी माहिती देताना , माझ्याकडे किरकोळ शेती आहे . मी मोलमजुरी करून जीवन जगत असून माझ्याकडे पैसे नसल्याने नसल्याने आपण नंतर फी भरू असे त्याला सांगितले होते मात्र त्याने आपल्याला जर आरक्षण असते तर इतकी रक्कम भरावी लागली नसती असे दोन वेळा म्हटलेले होते त्यानंतर त्याने टोकाचे पाऊल उचलले , ‘ असे म्हटलेले आहे .


शेअर करा