निवडणूक येताच भाजपचे विमान जमिनीवर , प्रियंका गांधी म्हणाल्या मोदीजी..

शेअर करा

जशा जशा निवडणुका जवळ येत आहेत तसे तसे मतदार गळाला लावण्यासाठी वेगवेगळी आमिषे दाखवण्यात येत आहेत. निवडणूक जवळ येताच भाजप सरकारने घरगुती गॅस सिलेंडरची किंमत कमी करण्याचे आश्वासन दिलेले असून मध्यप्रदेशातील धार इथे बोलताना प्रियंका गांधी यांनी एवढे वर्ष सत्तेत असताना हे काम आधी का केले नाही ? असा खडा सवाल विचारलेला आहे.

जीएसटी आणि नोटबंदी वरून देखील प्रियंका गांधी यांनी सरकारला धारेवर धरलेले असून , ‘ सरकारच्या निर्णयामुळे छोट्या व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात संकटाचा सामना करावा लागला. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या सरकारने बंद केल्या त्यामुळे बेरोजगारी देखील वाढलेली असून सणासुदीच्या काळात देखील छोट्या छोट्या वस्तूंवर जीएसटी लावला असल्याकारणाने नागरिकांना प्रचंड आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे ‘, असे देखील त्या म्हणाल्या.


शेअर करा