मगरींना मृतदेह खाऊ घालणारा भारतातला सिरीयल किलर डॉक्टर , गुन्हे इतके भयावह की..

शेअर करा

काही गुन्हेगारांना एखादा गुन्हा पचवल्यानंतर गुन्हा करण्याची चटकच लागते आणि त्यानंतर त्यांचे सिरीयल किलरमध्ये परावर्तन होते . असाच एक प्रकार राजस्थान इथे समोर आलेला असून देवेंद्र शर्मा असे या सिरीयल किलरचे नाव आहे. गॅस सिलींडर लुटीपासून तर किडनी विकण्यापर्यंत अनेक गुन्हे केल्यावर त्याने टॅक्सीचा वापर करून त्याने आतापर्यंत 100 पेक्षा जास्त लोकांचा खून केलेला असून विशेष म्हणजे हा व्यक्ती व्यवसायाने डॉक्टर आहे.

उत्तर प्रदेशातील अलिगढ येथील तो मूळ रहिवाशी होता. 1994 मध्ये तो आयुर्वेदिक डॉक्टर बनला मात्र त्याने भरपूर पैसे कमावण्याच्या नादात सुरुवातीला बनावट गॅस एजन्सी खोलली आणि दरोडा टाकणारी टोळी तयार केली. दरोडा टाकण्यासाठी तयार करण्यात आलेल्या टोळीचा मुख्य उद्देश हा गॅस सिलेंडरचे ट्रक लुटण्याचा होता.

ट्रकचालकाची हत्या करून हा ट्रक लुटला जायचा आणि त्यानंतर चोरण्यात आलेले गॅस सिलेंडर विकले जायचे अशाच पद्धतीने या टोळीने 24 जणांना ठार मारले त्यानंतर त्याने हे काम सोडले मात्र त्याचे गुन्हे थांबले नाहीत. आरोपीने त्यानंतर किडनी ट्रान्सप्लांट करण्याचा एक नवीन उद्योग सुरू केला. एका किडनीसाठी तो सात लाख रुपये घ्यायचा अशाच पद्धतीने त्याने 125 किडन्या प्रत्यारोपीत केल्या. पैशासाठी काहीही करण्याची त्याची तयारी असायची.

किडनी व्यवसायानंतर त्याने दिल्लीत आल्यावर टॅक्सी चालक हे त्याच्या नजरेत असायचे. देवेंद्र शर्मा हा आणि त्याच्या टोळीतील सदस्य पर्यटक असल्याचे भासवत टॅक्सी बुक करायचे त्यानंतर टॅक्सीत बसून काही अंतर गेल्यानंतर ड्रायव्हरचा खून करायचे. ड्रायव्हरचा मृतदेह टॅक्सीतून घेऊन जायचे आणि मगरीला खाण्यासाठी मेरठच्या कालव्यात टाकायचे अशाच पद्धतीने त्याने अनेक मृतदेह मगरींना खाऊ घातले होते.

2004 साली त्याला अटक करण्यात आली त्यावेळी त्याने शंभरपेक्षा अधिक खून केल्याची कबुली दिलेली असून सोळा वर्ष तुरुंगात राहिल्यानंतर तो 2020 मध्ये पॅरोलवर बाहेर आला आणि फरार झाला. दिल्लीत त्याने लग्न केले मात्र दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केली आणि ती तुरुंगात सध्या तो तिहार तुरुंगात सध्या तो शिक्षा भोगत आहे.


शेअर करा