आरडाओरडा करून शिवीगाळ का करता ? , केडगावमध्ये दमदाटी केली अन.. 

शेअर करा

नगर शहरात किरकोळ कारणावरून कायदा हातात घेण्याचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत असून असाच एक प्रकार शहरातील केडगाव परिसरात समोर आलेला आहे . आरडाओरडा करून शिवीगाळ का करता ? असा विचारण्याचा राग आल्यानंतर एका व्यक्तीला तीन जणांनी बेदम मारहाण केलेली आहे . केडगाव मधील शहर बँकेच्या एटीएम समोर 29 डिसेंबर रोजी हा प्रकार घडलेला आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , जालिंदर रामदास आंबेकर ( वय 38 वर्ष राहणार सावली सोसायटी भूषण नगर केडगाव ) असे आरोपी व्यक्ती फिर्यादी व्यक्ती यांचे नाव असून तीस तारखेला त्यांनी कोतवाली पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

विशाल रामदास कांबळे , अविनाश अशोक भिंगारदिवे आणि एक अनोळखी इसम ( सर्वजण राहणार वैष्णव नगर केडगाव ) हे मोठमोठ्याने आरडाओरडा आणि शिवीगाळ करत होते. सार्वजनिक शांतता त्यामुळे भंग होत असल्याकारणाने रात्री साडेआठच्या सुमारास 29 तारखेला फिर्यादी व्यक्ती यांनी त्यांना आरडाओरडा न करण्याची विनंती केली त्यावरून विशाल रामदास कांबळे याने फिर्यादी यांना लाकडी दांडक्याने धमकावले त्यानंतर फिर्यादी व्यक्ती यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तीनही आरोपींच्या विरोधात फिर्याद दिली आहे. 


शेअर करा