मोठी बातमी..पुण्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर गोळीबार

शेअर करा

पुण्यातून एक मोठी बातमी आलेली असून आज शुक्रवारी सकाळी पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर गोळीबार करण्यात आलेला आहे. कोथरूड परिसरात हा हल्ला करण्यात आलेला असून मोहोळ याच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या.शरद मोहोळ गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती आहे. 

शरद मोहोळ याच्यावर हा जीवघेणा हल्ला टोळीने केला की एखाद्या व्यक्तीने याचा तपास सध्या सुरू आहे . शरद मोहोळ हा पुण्यातील गुंड असून त्याच्यावर हत्येचा प्रयत्न , खंडणी अपहरण यासारखे अनेक गुन्हे दाखल आहेत . पिंटू मारणे हत्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आलेली होती त्यानंतर तो जामिनावर बाहेर आला मात्र दासवे गावचे सरपंच शंकर धिंदळे यांचे अपहरण केल्याच्या प्रकरणात त्याला पुन्हा अटक करण्यात आलेली होती. 

शरद मोहोळ याने येरवडा कारागृहात त्याचा साथीदार विवेक भालेराव याच्या मदतीने दहशतवादी कृत्यांमध्ये सहभाग असलेला कातिल सिद्दिकी याचा खून केलेला होता. या प्रकरणात त्याला जामीन मिळाला मात्र बाहेर आल्यानंतर देखील त्याची अशा स्वरूपाची कृत्ये सुरूच होती . जुलै 2022 मध्ये पुणे जिल्ह्यातून शरद मोहोळ याला सहा महिन्यांसाठी तडीपार देखील करण्यात आलेले होते 


शेअर करा