जालन्यात मध्यरात्री पोलिसांच्या गाडीसमोर संपूर्ण गाव , मंत्र्यांचा ‘ इगो ‘ दुखावला म्हणून.. 

शेअर करा

रावसाहेब दानवे आणि आमदार नारायण कुचे यांना गावात येण्यासाठी विरोध केला म्हणून जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात बुटेगावमधील काही मराठा तरुणांना मध्यरात्रीच्या सुमारास ताब्यात घेण्यासाठी पोलीस पोहोचले मात्र गावकरी आक्रमक झाल्यामुळे पोलिसांना रिकाम्या हाताने परतावे लागलेले आहे.

आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी यावेळी , ‘ आम्ही आमदार मंत्र्यांच्या दारात गेलो नाही तर आमच्या दारात ते कशासाठी आले . अगोदर त्यांच्यावर कारवाई करा ‘ अशी मागणी केली. संपूर्ण गाव पोलिसांसमोर आडवे आले आणि या तरुणांची पोलिसांकडून सुटका केली. ग्रामस्थच आक्रमक झाल्यामुळे अखेर तरुणांना सोडून देत पोलीस रिकाम्या हाती परतले. 

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि आमदार नारायण कुचे यांना मराठा समाजाकडून गावात येण्यास बंदी करण्यात आलेली होती. विशेष म्हणजे सदर प्रकारानंतर अवघ्या काही तासांच्या आत मराठा तरुणांना ताब्यात घेण्यासाठी मध्यरात्रीच्या सुमारास बुटेगावमध्ये पोलीस पोहोचले . तरुणांना ताब्यातही घेतले मात्र संपूर्ण गाव यावेळी गाडी समोर आला आणि त्यानंतर पोलिसांना प्रश्न विचारू लागला त्यानंतर पोलिसांनी अखेर नमते घेत तरुणांची सुटका केली आणि तेथून निघून गेले. 

मराठा आंदोलकांनी यावेळी , ‘ मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी मोठा लढा उभारलेला आहे . राज्य सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण मंजूर केले मात्र आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे तरच ते कायद्यात टिकू शकेल , असे म्हणत आरक्षण जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत नेत्यांना आमच्या दारात येऊ देणार नाही असे देखील मराठा बांधवांकडून सांगण्यात आलेले आहे. 


शेअर करा