पोलीस निरीक्षकाची बीडमध्ये आत्महत्या ,  मृतदेहाजवळ आढळली एक चिठ्ठी

शेअर करा

महाराष्ट्रात एक अत्यंत दुर्दैवी असा प्रकार समोर आलेला असून पुण्यात सीआयडी विभागात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक त्यांचे मूळ गाव असलेले बीड जिल्ह्यातील परळी येथे येऊन रेल्वे समोर उडी मारून आत्महत्या केलेली आहे. शनिवारी सकाळी ही घटना समोर आलेली असून कौटुंबिक वादातून हा प्रकार घडलेला असल्याचे त्यांच्याजवळ आढळून आलेल्या चिठ्ठीतून समोर आलेले आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , सुभाष दुधाळ ( वय 40 वर्ष राहणार बीड ) असे मयत पोलीस अधिकारी यांचे नाव असून बीडच्या सीआयडी भागात ते कार्यरत होते. 

पुण्यात त्यांची बदली झाली मात्र अधूनमधून ते गावी येत असायचे अशाच पद्धतीने ते गावी आले आणि त्यानंतर त्यांनी रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पत्नी यांनी ते घरातून निघून गेल्याप्रकरणी पोलिसात फिर्याद दिली होती आणि हा तपास सुरू असतानाच त्यांचा मृतदेह आढळून आला . 


शेअर करा