बॉलीवूड केंद्रापुढे नतमस्तक मात्र साउथमधून सीएए विरोधात सुपरस्टारचा आवाज

शेअर करा

संपूर्ण बॉलीवूड केंद्र सरकारपुढे नतमस्तक झालेले असताना दुसरीकडे साउथ सुपरस्टार थलापती विजय यांनी केंद्र सरकारने सोमवारी संध्याकाळी सीएए लागू करण्याविषयी जो अध्यादेश जारी केला त्यावर टीका केलेली आहे. 

थलापती विजय यांनी एक निवेदन जारी केलेले असून त्यामध्ये म्हटले आहे की , “ तामिळनाडूमध्ये सीएए लागू होऊ देणार नाही. आपल्या देशात सर्व नागरिक सामाजिक सदभावनेने वास्तव्य करत आहेत अशा वेळी भारतीय नागरिकता संशोधन कायदा 2019 अर्थात सीएए ची गरज नाही ‘ 

थलपती विजय पुढे म्हणाले की , ‘ सीएए कायदा तामिळनाडूमधील लागू होणार नाही यासाठी नेत्यांनी विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. तामिळनाडूमध्ये हा कायदा लागू करण्यात येऊ नये असे आपले म्हणणे आहे , ‘ असे देखील ते पुढे म्हणाले आहेत


शेअर करा