अकोले तालुक्यात बायकोचा खून करून पती स्वतःहून पोलिसात हजर , म्हणाला की.. 

शेअर करा

नगर जिल्ह्यात एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून अकोले तालुक्यातील राजुर परिसरात शिळवंडी इथे पती संशय घेत असल्याकारणाने वाद झाल्यानंतर पतीने कुऱ्हाड आणि कोयत्याने तिची हत्या केली आणि त्यानंतर स्वतःहून तो पोलीस ठाण्यात हजर झाला. 

सदर घटना ही 18 मार्च रोजी सकाळी अकराच्या सुमारास घडलेली असून पतीने केलेल्या खुनी हल्ल्यात सुनिता संतोष साबळे ( वय 40 वर्ष राहणार शिळवंडी तालुका अकोले ) यांचा मृत्यू झालेला आहे. आरोपी संतोष साबळे ( वय 45 ) हा खून केल्यानंतर स्वतःहून राजुर पोलिसात हजर झाला. 

सदर दांपत्याचा वीस वर्षांपूर्वी विवाह झालेला होता. अनेक वर्ष सुखाने संसार झाला मात्र संतोष सातत्याने पत्नीवर संशय घेत असल्याने त्यांच्यात वाद सुरू होते. 18 तारखेला सकाळी घरात नेहमीप्रमाणे वातावरण असताना त्यांच्यात वाद झाला आणि संतोष याने पत्नीला शिवीगाळ दमदाटी सुरू केली आणि रागाच्या भरात कुऱ्हाड आणि कोयता तिच्या डोक्यात मारला. 

आरोपीने केलेल्या खुनी हल्ल्यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला. काही वेळानंतर संतोषचा राग शांत झाला मात्र तोपर्यंत पत्नीने प्राण गमावलेले होते . आरोपी संतोष हा त्यानंतर पोलिसात पोहोचला आणि त्याने झालेला प्रकार कथन केला.  सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केलेला असून सुनिता यांच्या भावाने या प्रकरणी पोलिसात फिर्याद दिली आहे. 


शेअर करा