नगर शहरात धरली तब्बल इतक्या लाखांची ‘ हवाला कॅश ‘, दोन जण ताब्यात 

शेअर करा

नगर शहरात हवालाच्या माध्यमातून आलेली तब्बल 72 लाख रुपयांची कॅश 21 तारखेला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडलेली असून दोन एजंट व्यक्तींना ताब्यात घेण्यात आलेले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने नगर शहरातील ख्रिस्त गल्ली आणि मार्केट यार्ड इथे ही कारवाई करण्यात आलेली आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , चेतन पटेल आणि आशिष पटेल अशी ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तींची नावे असून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेच्या दृष्टीने पोलीस प्रशासन देखील सतर्क आहे. हवालामार्फत शहरात मोठी रोकड आली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली आणि त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केलेली आहे. 


शेअर करा