वसंत मोरे यांचं अखेर ठरलं , लोकसभा निवडणुकीबद्दल घेतला मोठा निर्णय 

शेअर करा

पुण्यातील मनसेचा चेहरा असलेले वसंत मोरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राजीनामा दिल्यानंतर त्यांची शरद पवार गटाशी जवळीक दिसून आलेली होती मात्र अखेर त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. 

महायुतीकडून भाजपचे मुरलीधर मोहोळ यांना तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आपली भूमिका स्पष्ट केलेली असून आगामी निवडणूक ते अपक्ष म्हणून लढवणार आहेत. 

मनसेचा राजीनामा दिल्यानंतर भावूक होऊन त्यांनी राज ठाकरे यांच्या प्रतिमेसमोर लोटांगण घेतलेले होते पक्षांतर्गत गटबाजीमुळे त्यांनी मनसे सोडली असून गेल्या काही दिवसांपासून ते कुठल्या राजकीय पक्षात जातात याकडे समस्त पुणेकरांचे लक्ष लागून राहिले होते .


शेअर करा