नगर शहरात आयपीएल सट्टेबाज झालेत सुसाट , पोलिसांचे मात्र दुर्लक्ष

शेअर करा

सध्या आयपीएल सिझन सुरू असल्याकारणाने नगर शहरात सट्टेबाजांचा बाजार पुन्हा एकदा सुरू झालेला आहे. पहिल्या चेंडूपासून तर शेवटच्या चेंडूपर्यंत सट्टेबाजीला ऊत आलेला असून अशा प्रकारांकडे पोलिसांचे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. 

नगर शहरात अनेक ठिकाणी बिर्याणी हाऊस , चहाचे स्टॉल , सलूनचे दुकाने अशा ठिकाणी सट्टेबाजांचे डाव रंगत असून सट्टेबाजांच्या विळख्यात शहरातील तरुण वर्ग तसेच व्यावसायिक अडकत चाललेले आहेत. मोठ्या प्रमाणात बुकींची देखील संख्या शहरात असून त्यामध्ये किरकोळ दुकानदारापासून तर मोठ्या व्यावसायिकांपर्यंत अनेकजण गुरफटले गेलेले आहेत.सट्टेबाजीत इतरांना आणले तर कमिशन मिळत असल्याने तरुणांना हेरून सट्टेबाज आपल्या विळख्यात ओढत आहेत. 

आजकाल सट्टेबाज देखील आधुनिक झालेले असून वेगवेगळ्या ॲपच्या माध्यमातून हा व्यवसाय सध्या चालतो. प्रत्येक आपला एक आयडी दिला जातो आणि त्यानंतर त्यामध्ये लॉगिन करून हा व्यवहार चालतो आणि कोडवर्डच्या माध्यमातून एकमेकांना फायदा झाला की तोटा हे कळवण्यात येते. सदर प्रकाराकडे पोलिसांचे मात्र दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. 


शेअर करा