‘ अच्छे दिन येणार येणार गं ‘ , मराठी गाण्याचा सोशल मीडियात धुमाकूळ

शेअर करा

पंतप्रधान मोदी यांनी 2014 मध्ये अच्छे दिन येणार असल्याचे सांगितले होते मात्र प्रत्यक्षात त्यांचे अच्छे दिन हे अडाणी अंबानीला आले.  देशभरात बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे तर महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आलेले आहेत. उच्च शिक्षण घेऊन देखील नोकरी मिळत नसल्याने उच्चशिक्षित तरुणांवर शिपाई मदतनीस म्हणून काम करण्याची वेळ आलेली आहे.  लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजलेले असून या पार्श्वभूमीवर  जुन्या मराठी गाण्यावर आधारित एक नवीन गाणे सोशल मीडियात सध्या चांगलेच चर्चेत आलेले आहे. 

काँग्रेस नेते प्रतीक पाटील यांनी या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलेला ट्विटर वर शेअर केलेला असून त्यामध्ये दोन महिला ‘ अच्छे दिन येणार येणार ग ‘  असे म्हणत हे गाणे गात आहेत.  सुमारे अडीच मिनिटांचे हे संपूर्ण गाणे असून त्यांच्या या गाण्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. सुमारे 3000 पेक्षा अधिक लोकांनी या गाण्याला पसंती दिलेल्या असून मोठ्या प्रमाणात हे मराठी गाणे सध्या शेअर केले जात आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आश्वासनांची या गाण्यात खिल्ली उडवली असून मोदी यांना काही प्रश्न देखील विचारलेले आहेत.  पंतप्रधान नरेंद्र मोदी अर्थातच कुठल्याही प्रश्नाला कधी उत्तरे देत नाहीत केवळ स्वतःची मन की बात नागरिकांवर थोपवण्यात धन्यता मानतात असेच आतापर्यंत दिसून आलेले आहे त्यामुळे या गाण्याची देखील मोदी कुठली दखल घेतील आणि विचार करतील असे समजणे म्हणजे भोळेपणा आहे.


शेअर करा