स्वतःचे पोट भरलेले असताना दुसऱ्याच्या ताटातून , अमित पंडीत अन दिलीप गांधींवर पोस्ट 

शेअर करा

नगर अर्बन बँक गैरव्यवहार प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत असून अनेक संचालक तसेच कर्जदार आज रोजी गजाआड आहेत. नगर अर्बन बँक बचाव कृती समितीचे अध्यक्ष राजेंद्र गांधी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिलेली असून त्यामध्ये स्वतःचे पोट भरलेले असताना दुसऱ्याच्या ताटातून ओढण्याच्या किळसवाण्या प्रवृत्तीवर त्यांनी संताप व्यक्त केलेला आहे. 

काय आहे राजेंद्र गांधी यांची व्हायरल झालेली पोस्ट ? 

अमित पंडीत आणी दिलीप गांधी…व्यक्ति नव्हे विकृती..स्वतः चे पोट भरलेले असताना दुसरेचे ताटातील ओढून घेणेची किळसवाणी वृती. एक अमृतवाहीनी बँकेचा चेअरमन तर दुसरा नगर अर्बन बँकेचा चेअरमन,बँकींग कायदे नियम सगळे चांगलेच माहीत असलेल्या परंतु त्या नियमांचा गैरफायदा कसा घ्यायचा याकडे लक्ष अमित पंडीतने कॉसमॉस बँकेचे 9 कोटीचे कर्ज काढले व थकविले…

कर्ज जाणीवपूर्वक थकवायचे आणि नंतर बँकांना ब्लँक मेल करायचे मला एक रकमी सवलत द्या तरच मी पैसे भरतो अशी भाषा वापरायची.दिलीप गांधी नगर अर्बन बँकेला मल्टीस्टेट दर्जा घेण्याचा डाव यशस्वी झाल्यामुळे कायद्याची कुठलीच भिती नसलेली राजकीय व्यक्ती ..

अमित पंडीतशी मैत्री मग काय दोघांचे ठरले कॉसमॉस बँकेला एक रकमी परतफेडमध्ये लूटायचे व कॉसमॉस बँकेचे पैसे नगर अर्बन बँकेच्या पैशाने फेडायचे व 9 कोटी घेणे ऐवजी थेट 33 कोटी घ्यायचे ( पोलीस तपासात समोर आलेला आकडा) अगदी बायका पोरांचे नावावर कर्जे दाखवायची…आणी आपआपसात वाटून घ्यायची 

भारी भारी गाड्या वापरायच्या छान छोकीत राहयचे रोजचा हजारो रूपयांचा अलिशान खर्च..दिलीप गांधी देखील त्याच विकृतिचे .. बायका पोरांचे नावावर मोठे मोठे कर्ज काढून रायसोनी व पटवर्धन पतसंस्था बंद पाडली इतर अनेक बँका पतसंस्था अडचणीमध्ये आणल्या. या बँका पतसंस्था मधील पैसे कोणाचे आहेत तर कोणी पित्याने मुलीचे लग्नाची सोय म्हणजे पै पै जमा केलेली तर कोणी वृध्दपकाळासाठी दवाखानेची सोय , दोन वेळचे चटणी भाकरीची तजवीज करायची म्हणून पोटाला चिमटा काढून अर्ध पोटी राहून जमविलेले पैसे..

नालायक विकृत लोक असे पैसे लूटून मौज मजा करतात राजकीय पोळी भाजून घेतात. समविचारी लोकांची भ्रष्टाचारी टोळी बनवायची तिला संचालक मंडळ असे गोंडस नांव द्यायचे..आता नगर अर्बन बँक बंद पडली अमित पंडीत अटक झाला तरी तो काय म्हणतो 33 कोटीचे 16 कोटी घ्या मी लगेचच पैसे भरतो. 

बँकेचे ठेवीदार दोन वर्षापासून उन्हातान्हात आंदोलन करत आहेत रडकुंडीला आले आहेत असे असताना या विकृत लोकांनी पैसे परत केले नाही आता अटक झालेनंतर म्हणतो आहे 16 कोटी घ्यायचे तर घ्या..अशा विकृतिना आम्ही तर विरोध करत राहणार…ज्यांना अशा विकृति आदर्श वाटतात त्यांनी स्वतः चे संस्कार तपासावेत ..


शेअर करा