‘ 45 दिवसात दुप्पट ‘, अवघ्या तीस वर्षाच्या तरुणाने केला इतक्या कोटींचा महाघोटाळा 

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून अवघ्या 45 दिवसात तुम्हाला दाम दुप्पट करून देतो असे आमिष दाखवत अवघ्या तीस वर्षांच्या ठगाने तब्बल 200 कोटी रुपयांचा महाघोटाळा केलेला आहे . कोल्हापूर येथील हे प्रकरण असून एका डॉक्टरसोबत तीन जणांची दोन कोटी 56 लाख रुपयांची फसवणूक केली त्यानंतर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , अक्षय अनिल कांबळे ( वय तीस वर्ष राहणार सादळे तालुका करवीर ) असे आरोपी तरुणाचे नाव असून सान्विक वेल्थ मॅनेजमेंट नावाने तो आर्थिक संस्था चालवत होता. त्याच्या विरोधात एका डॉक्टरांनी फिर्याद दिली आणि त्यानंतर चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मुख्य सूत्रधार अक्षय कांबळे , प्रताप लक्ष्मण गोसावी ( राहणार  जिल्हा सांगली ), रवींद्र देवणे ( तालुका करवीर ) आणि विवेक धनवडे अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित व्यक्तींची नावे आहेत. 

आरोपी अक्षयला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केलेली आहे. आरोपी अक्षय कांबळे याने तक्रारदार यांना 45 दिवसात रक्कम दुप्पट रक्कम करून देईल असे आश्वासन दाखवले त्यानंतर डॉक्टरांनी त्याच्याकडे रक्कम जमा केलेली होती मात्र परतफेड करून मूळ रक्कम देखील देण्यात अपयश आले आणि अखेर प्रकरण पोलिसांपर्यंत जाऊन पोहोचले.


शेअर करा