स्वतःच्या घरात गांजा विक्री करणारी महिला ताब्यात , स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

शेअर करा

स्वतःच्या राहत्या घरातच गांजा विक्री करणाऱ्या एका महिलेला अटक करण्यात आलेली असून राहता तालुक्यातील शिर्डी येथील हे प्रकरण आहे.  महिलेच्या घरात छापा टाकून चार किलो दीडशे ग्रॅम गांजा तिच्याकडून जप्त करण्यात आलेला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केलेली आहे

उपलब्ध माहितीनुसार , मड्डू सलीम शेख ( वय 44 राहणार एकरूखे रोड राहता ) असे आरोपी महिलेचे नाव असून गुप्त सूत्रांच्या माध्यमातून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  दिनेश आहेर यांना या प्रकरणी माहिती मिळाली होती . पथकाने खात्री करून घेतली आणि त्यानंतर कारवाई करत शेख हिला ताब्यात घेतले. 

आरोपी महिलेने घरातील दिवाणमध्ये एका गोणीत गांजा लपून ठेवलेला होता. तिच्या विरोधात सहाय्यक फौजदार दत्तात्रय हिंगडे यांनी राहता तालुका पोलिसात फिर्याद दाखल केल्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आलेला असून जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी सहाय्यक निरीक्षक हेमंत थोरात दत्तात्रय इंगळे , बापूसाहेब फुलाने यांच्यासोबत ही कारवाई केलेली आहे . 


शेअर करा