‘ अबकी बार किसान सरकार ‘ , गुलाबी वादळ नगर जिल्ह्यात शांत झालंय ? 

शेअर करा

नगर शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ‘ अबकी बार किसान सरकार ‘ असे फ्लेक्स लावून तेलंगानाचे तत्कालीन मुख्यमंत्री केसीआर यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात जनसंघटन करण्याचे काम सुरू करण्यात आलेले होते मात्र लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे गुलाबी वादळ जिल्ह्यात शांत दिसत आहे. 

केंद्र सरकारच्या अनेक निर्णयामुळे शेतकरी बांधव नाराज असल्याने मोठ्या प्रमाणात केसीआर यांच्या पक्षाला महाराष्ट्रात वेलकम होण्याची अपेक्षा होती आणि सुरुवातीला काही प्रमाणात शेतकरी केसीआर यांच्या पाठीशी उभा राहिला मात्र आज रोजी या पक्षात प्रवेश केलेले कार्यकर्ते आणि नेते हेच फारसे सक्रिय दिसून येत नाहीत. 

तेलंगाना विधानसभा निवडणुकीत केसीआर यांना अपेक्षित असे यश मिळाले नाही आणि त्यानंतर राहत्या घरात अपघात झाल्याने केसीआर रुग्णालयात ऍडमिट झाले. केसीआर यांच्या मुलीवर देखील कथित मद्य घोटाळा प्रकरणी कारवाईचे संकेत होते त्यानंतर पक्षाचाच आवाज कमी झालेला आहे . 

सुरुवातीला टीआरएस नाव असलेल्या पक्षाने देशभरात पक्ष विस्तारासाठी पक्षाच्या नावात बदल करून बीआरएस ( भारत राष्ट्र समिती ) असे नाव केले मात्र अद्यापपर्यंत हा पक्ष लोकसभा निवडणूक लढवणार की नाही याविषयीच शंका आहे.


शेअर करा