मंडी मतदारसंघात कंगना राणावतच्या विरोधात इंडिया आघाडीचा ‘ हा ‘ दिग्गज अभिनेता

शेअर करा

भारतीय जनता पार्टीने हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून अभिनेत्री कंगना राणावत हिला लोकसभेचे तिकीट दिल्यानंतर इंडिया आघाडीकडून या ठिकाणी कोण लढणार याची सोशल मीडियात जोरदार चर्चा होती.  कंगना राणावत हिच्या विरोधात अखेर इंडिया आघाडीकडून एका अभिनेत्याचीच निवड करण्यात आलेली असून मंडी लोकसभा संघ आता देशभरात चर्चेत आलेला आहे. 

गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने मोदी यांच्या विरोधकांवर निशाणा साधणारी कंगना राणावत हिची ‘ खरे स्वातंत्र्य 2014 नंतर मिळाले ‘ अशी काही वादग्रस्त वक्तव्य यापूर्वी चर्चेत आलेली होती. कंगना राणावत हिच्यावर अनेकदा टीका देखील झाली मात्र मंडी लोकसभा मतदारसंघातून तिला भाजपचे तिकीट देण्यात आल्यानंतर तिच्याबद्दल ट्विटरवर एक ‘आक्षेपार्ह ‘ ट्रेंड देखील सुरू झालेला होता. 

इंडिया आघाडीकडून मंडी लोकसभा मतदारसंघासाठी अभिनेता गोविंदा याचे नाव चर्चेत असून गेल्या अनेक वर्षांपासून गोविंदा चित्रपटसृष्टीत सक्रिय देखील नाही . एकेकाळी सुपरस्टार असलेला गोविंदा सध्या बॉलीवूडमध्ये फारसा कार्यरत दिसून येत नाही .गोविंदाने याआधी देखील काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवलेली होती आणि त्यात यश देखील मिळवलेले होते मात्र त्यानंतर राजकारणापासून लांब राहणे गोविंदाने पसंत केले. मंडी मतदारसंघात आता कंगना राणावत विरुद्ध अभिनेता गोविंदा असा संघर्ष रंगण्याची दाट चिन्हे आहेत . 


शेअर करा