अजित पवार बनले भाजपचे स्टार प्रचारक ,  बघा पटतंय का म्हणत.. 

शेअर करा

भाजपकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आलेली असून त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव तेराव्या नंबरला आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून ‘ बघा पटतय का ‘ असे म्हणत एक पोस्ट फेसबुकवर शेअर करण्यात आलेली असून त्यामध्ये शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांना तिलांजली देऊन संविधान बदलण्याची मानसिकता असलेल्या सोबत अजित पवार सामील झाल्यावरून मतदारांनी नक्की विचार करावा असे आवाहन करण्यात आलेले आहे. 

राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटाकडून ही पोस्ट फेसबुकला शेअर करण्यात आलेली असून पोस्टमध्ये भाजपच्या स्टार प्रचारकाची यादी देखील जोडलेली आहे सोबतच ,  बघा पटतय का असे म्हणत , ‘ शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांनी काम करतो म्हणणारे आता संविधान बदलण्याची मानसिकता असणाऱ्यांसोबत सभेत सामील होणार आहेत म्हणे ! पक्ष चोरून पक्षाच्या विचारांना आणि महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला तिलांजली दिली जात असल्याचे चित्र आज स्पष्ट दिसत आहे. पण महाराष्ट्राचे सुजाण नागरिक या अशा सभांना आणि या विचारांना कधीच राज्यात रुजू देणार नाही, हे निश्चित ‘ असे म्हटलेले आहे. 

भाजपच्या इतर स्टार प्रचारकांमध्ये प्रज्ञा ठाकूर , अनुराग ठाकूर , योगी आदित्यनाथ , अनंतकुमार हेगडे तसेच कपिल मिश्रा यांचा देखील समावेश असून सातत्याने चिथावणीखोर आणि सामाजिक विद्वेष पसरवणारी वक्तव्य करणाऱ्या या व्यक्तींसोबत अजित पवार आता स्टेजवर दिसतील यावर देखील शरद पवार गटाकडून निशाणा साधण्यात आलेला आहे. 


शेअर करा