नगरजवळ विवाहित महिलेचे टोकाचे पाऊल ,  पती कामाला गेलेला असतानाच.. 

शेअर करा

नगरजवळ विवाहित महिलेचे टोकाचे पाऊल

नगर शहराजवळ एक धक्कादायक अशी घटना समोर आलेली असून एका 24 वर्षीय विवाहित महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. नगर तालुक्यातील देहरे गावातील ही घटना असून दहा तारखेला बुधवारी हा प्रकार घडलेला आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , सुप्रिया रवींद्र धनवटे ( राहणार देहरे तालुका नगर ) असे मयत महिलेचे नाव असून सुप्रिया यांचे पती मोलमजुरीचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. बुधवारी दहा तारखेला ते कामावर गेले होते . सुप्रिया यांच्या सासूबाई देखील कामानिमित्त बाहेर असताना सुप्रिया यांनी घरात दोरीच्या साह्याने गळफास लावून घेतला. 

सासू पुष्पा हरीकिसन धनवटे घरी आल्या त्यावेळी त्यांना हा प्रकार लक्षात आला आणि शेजाऱ्यांच्या मदतीने तात्काळ सुप्रिया यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झालेला होता. एमआयडीसी पोलिसात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. सुप्रिया यांच्या पाठीमागे सासू, दीर आणि एक लहान मुलगा असे कुटुंबीय असून घटनेमागचे कारण अद्यापपर्यंत समोर आलेले नाही. 


शेअर करा