अजित पवार यांच्या दौऱ्याच्या वेळी अनुपस्थितीत राहिलेले धनंजय मुंडे ‘ ह्या ‘ कार्यक्रमाला मात्र होते उपस्थित

शेअर करा

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याच्यासोबत घनिष्ठ संबंध असल्याचे समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागलेला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले असताना धनंजय मुंडे हे अनुपस्थित राहिले होते . राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू आहे. 

प्रकृतीचे कारण देत धनंजय मुंडे यांनी हे गैरहजर राहिलेले असले तरी त्यांच्या मोठ्या मुलीच्या फॅशन शोला मात्र त्यांनी मुंबईत हजेरी लावलेली होती. धनंजय मुंडे यांनी  ट्विटरवर एका पोस्टवर आपण गैरहजर का आहोत याविषयी प्रकृतीचे कारण दिलेले होते मात्र मुलीच्या फॅशन शो ला धनंजय मुंडे आवर्जून उपस्थित होते त्यामुळे सोशल मीडियात धनंजय मुंडे यांनी मुद्दाम अजित पवार यांच्या दौऱ्याच्या वेळी अनुपस्थिती दाखवलेली आहे का याची चर्चा सुरू झाली. 

धनंजय मुंडे यांची मोठी कन्या फॅशन डिझायनर असून तिचा पहिलाच फॅशन शो होता शिवाय तिने डिझाईन केलेल्या काही वेशभूषा या सोहळ्यात वापरण्यात आलेल्या होत्या . गेटवे ऑफ इंडिया येथे हा फॅशन सोहळा मंगळवारी रात्री पार पडला. मुख्य प्रवाहापासून धनंजय मुंडे सध्या काहीसे बाजूला पडलेले दिसून येत आहेत. 


शेअर करा