राहुरी इथे राष्ट्रपुरुषाच्या पुतळ्याच्या विटंबनाची दुर्दैवी घटना घडलेली होती. पोलिसांनी गुढीपाडवा आणि ईद असल्याचे कारण पुढे करत तपासासाठी वेळ मागितला. पाच दिवस उलटले तरी अद्यापपर्यंत आरोपींचा शोध लागला लागलेला नाही आणि तपासातही प्रगती झालेली नाही. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी यापूर्वीच प्रशासनाने शोध न घेतल्यास बेमुदत राहुरी बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे.
सकल मराठा समाज , मराठा एकीकरण समिती , मराठा क्रांती मोर्चातर्फे लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा देवेंद्र लांबे यांनी दिलेला असून राहुरीकरांच्या संयमाचा कडेलोट होत असून प्रशासनाने आणखीन पाच दिवस घ्यावेत मात्र पाच एप्रिलपर्यंत आरोपीला अटक करावी नाहीतर तपास सीआयडीकडे सोपवावा अशी मागणी केलेली आहे.
राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी ,’ या प्रकरणात राष्ट्रपुरुषाच्या पुतळ्याची विटंबना घडल्यानंतर रास्ता रोको आंदोलन आणि करण्यात आलेले होते . पोलिसांनी स्फोटक परिस्थिती देखील संयमाने हाताळली असून सीसीटीव्ही फुटेज यांच्या तांत्रिक विश्लेषणावर सध्या तपास सुरू आहे. आत्तापर्यंत आम्ही चौकशी केलेली आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यासाठी पोलीस प्रशासन प्रतिबद्ध आहे ,’ असे म्हटलेले आहे.