‘ बाजार के अंदर जो धंदे लगे वो आमदार साब की वजह से लगे ‘, कापड बाजारातील आरोपी अज्जू खानचा व्हिडिओ झाला व्हायरल

शेअर करा

नगर शहरातील कापड बाजार परिसरात एका व्यापाऱ्याच्या मुलीला मारहाण करण्यात आल्यानंतर महापालिकेने बाजारपेठ अतिक्रमण मुक्त करण्यासाठी कंबर कसलेली आहे. आमदार संग्राम जगताप यांनी व्यापाऱ्यांना भेटून कारवाईचे आश्वासन दिलेले होते त्यानंतर तात्काळ ही कारवाई करण्यात आली. कापड बाजार , शहाजी रोड गंज बाजार येथील अतिक्रमणे हटवण्यात आलेली असून बाजारपेठ आता मोकळा श्वास घेत आहे. 

दुसरीकडे कापडाबाजारातील व्यापाऱ्याच्या मुलीला मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी हा आमदार संग्राम जगताप यांचाच कार्यकर्ता असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून आरोपी अजमत उर्फ अज्जू खान याचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झालेला आहे या व्हिडिओमध्ये तो आमदार संग्राम जगताप यांचे काम करायचे आहे असा असे बोलताना आढळून येतो. 

सदर व्हिडिओ हा नेमका कधीचा आहे याविषयी स्पष्ट माहिती नसून त्यात तो आमदार नितेश राणे यांचा देखील उल्लेख करतो सोबतच आपण संग्राम जगताप यांचे काम का करायचे असे देखील सांगतो. आज बाजारात जे काही धंदे लागतात ते आमदारांमुळेच लागतात असाही दावा तो या व्हिडिओमध्ये करत आहे .आमदार संग्राम जगताप यांनी बाजारपेठेत जाऊन कारवाईचा इशारा दिला त्यानंतर  महापालिकेने कारवाई केलेली असली तरी व्यापाऱ्याच्या मुलीला मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी हा संग्राम जगताप यांचाच कार्यकर्ता असल्याचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झालेले होते. आरोपी अजमत उर्फ अज्जू खान याचे अनेक फोटो आमदार संग्राम जगताप यांच्यासोबत दिसून येत असून शहरातील सामाजिक स्वास्थ बिघडवण्याच्या उद्देशानेच असे प्रकार केले जात असल्याच्या चर्चेला फोडणी मिळालेली आहे. 

अहिल्यानगर शहरातील शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते किरण काळे यांनी देखील हा व्हिडिओ त्यांच्या फेसबुक अकाउंट ला शेअर केलेला असून त्यामध्ये ,’ #बेगडी हिंदुत्ववादी #आमदाराची #पोलखोल करणारा हा #धक्कादायक_व्हिडिओ समोर आला आहे… दूध का दूध, पाणी का पाणी समोर आहे… अहिल्यानगर मधील तमाम हिंदूंनी झुल पांघरलेल्या लांडग्यापासून सावध राहावे… #आपल्या_हिंदू_आया_बहिणींवर_हल्ला करून मारहाण करणारा हा #नराधम तथाकथित #स्वयंघोषित धर्मरक्षक आमदाराचाच सोडलेला पाळीव पंटर आहे… #गंगाधर_ही_शक्तिमान_है… # अहिल्यानगर शहर शिवसेना UBT ‘ असे म्हटलेले आहे. 


शेअर करा