‘ संग्रामउद्दीन ‘ म्हणत हिरव्या टोपीतील मिम , आमदार संग्राम जगतापांना पुन्हा डिवचलं 

शेअर करा

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अहिल्यानगर शहर प्रमुख किरण काळे यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना डिवचले आहे. काळे यांनी जगताप यांचे हिरव्या टोपीतील मिम समाज माध्यमांवर पोस्ट केले असल्याने शहरातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. किरण काळे यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीची मुकुंदनगर भागातील मतदानाची आकडेवारी पोस्ट करून संग्राम जगताप यांना मुस्लिम बहुल एरियातून किती मते मिळाली हे देखील जाहीर केलेले आहे. 

किरण काळे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘ हिरव्यामुळे राजकीय जन्म झालेल्या, पण आता भगव पांघरून खोटा, ढोंगी, हिंदु धर्मरक्षक झालेला संग्रामउद्दिन हारूण पठाण… अखंड हिंदू बांधवांनी अशा स्वयंघोषित हिंदू जननायक, स्वयंघोषित हिंदू धर्मरक्षक म्हणवणाऱ्या लबाडांपासून सावध राहावे. शेळी न वाघाचं कातड पांघरलं, तरी ती शेळीच राहते, वाघ होत नाही. ओरिजनल एकमेव हिंदू धर्मरक्षक स्व. अनिल भैय्या राठोड हे आयुष्यभर हिंदूंशी प्रामाणिक राहिले.  

किरण काळेंनी पुढे म्हटले आहे की , ताबेमारी, दहशत, गुंडगिरी, दादागिरी, बनावट आयटी पार्क अशा आपल्या असंख्य पापांवरून समाजाचे लक्ष हटविण्यासाठी हिंदुत्वाच्या खोट्या अजेंडाच्या माध्यमातून चालवलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे. बदका सारखी चाल, पेंग्विन सारखी उंची असणाऱ्या वाचाळवीर नितेश याला, तुझी उंची माझ्या शर्टाच्या बटना इतकी देखील नाही असं म्हणून हिणवणाऱ्या त्याच नितेशच्या मांडीला मांडी लावून बसण्याची नामुष्की या स्वयंघोषितावर आली आहे. अहिल्यानगर शहरासह महाराष्ट्रात युवकांच्या रोजगाराचा, उद्योजकांच्या व व्यापाऱ्यांच्या प्रगतीचा, गोरगरीब, कष्टकरी, हातावर पोट भरणाऱ्यांच्या जगण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. महागाई प्रचंड वाढलेली आहे. हे प्रश्न अहिल्यानगर वासियांसाठी महत्त्वाचे आहेत. 

किरण काळे पुढे म्हणतात की , ‘  कोणीतरी उठणार आणि स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी केलेल्या कृत्यामुळे शहराचे अतोनात न भरून निघणारे नुकसान होणार. हे काही शहराच्या हिताचे नाही. आज तमाम हिंदू लाडक्या बहिणी यांना केलेला वादा हे महायुती सरकार पूर्ण करताना मेटाकुटीला आले आहे. त्यांची नियतच स्वच्छ नाही. शेतकरी कर्जमाफी करू म्हणाले पण ती देखील केली नाही. हिंदू युवकां समोर बेरोजगारीचा प्रश्न आ पासून उभा आहे. हिंदू मुलांची वय ३५-४० झाली तरी लग्न व्हायला तयार नाहीत. आजमीतीस अहिल्यानगर शहरामध्ये नियोजन शून्य कारभारामुळे संपूर्ण शहर एकाच वेळी ऐन पावसाळ्यात खोदून ठेवले आहे. व्यापारी बांधवांसह सामान्य नागरिकांना यामुळे प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. नळाला दररोज, स्वच्छ, मुबलक, योग्य वेळी पाणी देणे सुद्धा यांना इतक्या वर्षात शक्य झाले नाही. सबंध शहराची यांनी कचराकुंडी करून ठेवली आहे. हे प्रश्न सर्व नगरकर बंधू-भगिनींसाठी महत्त्वाचे आहेत. विशेष म्हणजे सर्व हिंदूंना देखील या प्रश्नांना तोंड द्यावे लागत आहे. 

किरण काळे यांनी आपल्या पोस्टमधून हिंदू बांधवांना आणि अहिल्यानगर वासियांना आवाहन केले आहे की, त्यामुळे ढोंगी, संधी साधू, लबाड, तथाकथित कार्यसम्राट, स्वयंघोषित हिंदू धर्मरक्षक, स्वयंघोषित हिंदू जननायकांपासून  सर्व हिंदू बांधवांनी सावध राहावे…! यांच्या आग लावण्यामुळे जर दंगली भडकल्या आणि हिंदू बांधवांना, विशेषत: माझ्या युवक मित्रांना तुरुंगात जावे लागेल. हा ढोंगी किंवा त्याच्या घरातील अन्य कुणी तुरुंगात जाणार नाही. पण माझ्या हिंदू तरुण बांधवांची आयुष्याची माती होईल. त्यामुळे अशा लबाडांपासून सावध राहिलेच बरे. आणि होय, शिवसेनेला कोणी हिंदुत्व शिकवू नये… ! जय श्रीराम ! ‘ ”

गेल्या काही महिन्यांपासून आमदार संग्राम जगताप यांचे समर्थक खासदार निलेश लंके यांच्यावर अशाच स्वरूपाची टीका आणि कमेंट सातत्याने करत आहेत. किरण काळे हे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे शहरप्रमुख असून खासदार निलेश लंके आणि बाळासाहेब थोरात यांचे जवळचे मानले जातात. किरण काळे यांच्या टिकेवर आता आमदार संग्राम जगताप काय उत्तर देतात ते आगामी काळात पहावे लागेल.


शेअर करा