‘ महाप्रचंड ‘ वेगाने किरीट सोमय्या यांच्या मुलाने पीएचडी कशी मिळवली ?

शेअर करा

एखाद्या विषयात पीएचडी मिळवणे म्हणजे येड्या गबाळ्याचे काम नाही. अनेक वेगवेगळ्या परीक्षा दिल्यानंतर अनेक वर्षे त्यात खर्च केल्यानंतर ही पीएचडीची डिग्री हातात मिळते मात्र भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या मुलाच्या पीएचडी डिग्रीची सध्या जोरदार चर्चा सुरू असून सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या दाव्यानुसार किरीट सोमय्या यांचे पुत्र निल सोमय्या यांनी अवघ्या चौथ्या महिन्यात ही डिग्री मिळवलेली आहे.

सतत फायलींचा गठ्ठा सोबत आणि कागदपत्रे दाखवून अनेक नेत्यांच्या पाठी चौकशीचा ससेमिरा लावणाऱ्या किरीट सोमय्या यांच्या मुलाच्या पदवीचा वाद सध्या चर्चेत आलेला आहे. अवघ्या चौदा महिन्यात नील सोमय्या यांनी पीएचडी डिग्री मिळवली कशी ? यावर देखील सोशल मीडियात उलट-सुलट प्रतिक्रिया येत आहेत. सोमय्या यांनी ऑगस्ट महिन्यात प्रबंध सादर केला होता त्यानंतर अवघ्या दिड महिन्यात म्हणजे ऑक्टोबरमध्ये तोंडी परीक्षा घेण्यात आली आणि तोंडी परीक्षेच्या दुसऱ्याच दिवशी त्यांना पीएचडी पदवी मुंबई विद्यापीठाकडून देण्यात आली.

सदर पदवीदान समारंभाचे काही फोटो निल सोमय्या यांनी सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केलेले असून ज्या महाप्रचंड वेगाने त्यांना पीएचडी देण्यात आली त्यावरून मुंबई विद्यापीठाच्या कार्यशैलीवर देखील चर्चा सुरू झालेली आहे. 17 सप्टेंबर 2016 रोजी नील सोमय्या यांनी परीक्षा देण्याचा दावा केला जात आहे तर दुसरा कागद निल सोमय्या यांच्या पीएचडीच्या पूर्ण कार्यक्रमाचा आहे त्यामध्ये पीएचडी रजिस्ट्रेशनची तारीख जून 2021 ची आहे. मुंबई विद्यापीठाकडून सर्व काही नियमात असल्याचा दावा केला जात आहे मात्र अवघ्या चौदा महिन्यात ही डिग्री मिळाली कशी यावर सोशल मीडियात चर्चा सुरु झाली आहे.


शेअर करा