वाल्मीक कराडच्या एनकाउंटरच्या सुपारीचा दावा करणारा रणजीत कासले याच्यावर कसला गुन्हा आहे दाखल ? 

शेअर करा

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला वाल्मीक कराड याचा एन्काऊंटर करण्याची सुपारी आपल्याला मिळालेली होती असा दावा निलंबित आणि वादग्रस्त पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले याने केलेला आहे. सदर व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चर्चेत असून कासले याच्यावर आणखीन एक गुन्हा यापूर्वीच नोंद असल्याची माहिती समोर आलेली आहे. 

रणजीत कासले याने सायबर पोलीस ठाण्यात नेमणूक असताना गुजरात राज्यात जाऊन दबाव टाकून पैसे मागितल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्याला निलंबित करण्यात आलेले होते. सोशल मीडियावर सातत्याने तो रिल्स बनवत असतो आणि त्याला प्रतिक्रिया देखील येतात. सायबर विभागात असताना वाल्मीक कराड याचा एन्काऊंटर करण्याची आपल्याला सुपारी मिळालेली होती असे त्याने म्हटलेले आहे. 

रणजीत कासले याच्यावर लातूर लोकसभा निवडणुकीतील विजयाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर त्याने पोस्ट केलेला होता. लातूरचे वकील भगवान कांडेकर यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात फिर्याद दिली आणि त्याच्या वक्तव्याने आपल्या भावना दुखावल्याचे म्हटलेले होते त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता.


शेअर करा