काँग्रेस सरकारचं तुघलकी धोरण,  मध्यरात्रीच्या सुमारास मोर आणि हरणांचा आक्रोश 

शेअर करा

देशात एक अत्यंत दुर्दैवी असा प्रकार हैदराबाद इथे समोर आलेला असून हैदराबाद केंद्रीय विद्यापीठात परिसरातील गचीबाउली येथील झाडे चक्क रात्रीच्या वेळी तोडून टाकण्यात आली त्यावेळी जीवाच्या आकांताने मोर ओरडत असल्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयापर्यंत हे प्रकरण पोहोचले आणि त्यानंतर न्यायालयाने वृक्षतोडीला गुरुवारी स्थगिती दिलेली आहे. 

सर्वोच्च न्यायालयाचा पुढील आदेश मिळेपर्यंत आता इथे कुठलेही काम सुरू करता येणार नाही. तेलंगाना सरकारबद्दल न्यायालयाने कठोर भूमिका घेतलेली असून वनक्षेत्रावरील झाडे तोडल्यास विकास काम करण्यासाठी कोणते तातडीचे कारण होते त्यासाठी राज्य सरकारने परवानगी घेतली आहे का ? असा खडा सवाल सर्वोच्च न्यायालयाने विचारला आहे. 

गचीबाउली परिसर हा सुमारे 400 एकरचा असून यामध्ये आयटी पार्कच्या निर्मितीसाठी जमिनीचा लिलाव करण्याचा प्रस्ताव होता मात्र पर्यावरणवादी आणि विरोधी पक्षांनी यासाठी आक्षेप घेतला त्यानंतर जमीन ताब्यात घेण्यासाठी रात्रीच्या वेळी बुलडोजर कारवाई करण्यात आली त्यावेळी या परिसरातील मोर जीवाच्या आकांताने ओरडत होते तर इतर प्राणी देखील प्राणी पक्षी देखील सैरभैर अवस्थेत दिसून आले. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकाराची तात्काळ दखल घेतल्यानंतर पर्यावरणप्रेमी नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. गचीबाउली परिसर हा निसर्गरम्य असून हैदराबादचे फुफ्फुस असा त्याचा उल्लेख केला जातो. 


शेअर करा