माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी दीनानाथ रुग्णालय प्रकरणात कठोर टीका करत मुख्यमंत्र्यांच्या आरोग्य मदत कक्षातून पाच फोन गेल्यानंतर देखील जर उपचार गर्भवती महिलेवर उपचार होत नसतील तर या रुग्णालय प्रशासनाला एवढी मग्रुरी आणि मस्ती कसली आहे ? असा प्रश्न विचारलेला आहे. भाजप आमदार स्वीय सहायक असलेल्या व्यक्तीच्या पत्नीला पैशासाठी ताटकळत ठेवले आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला असा या पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर आरोप आहे .
उद्धव ठाकरे म्हणाले की , ‘ दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील दुर्दैवी घटनेतील कुटुंबाला न्याय मिळायला हवा. रुग्णालयाने महिलेच्या कुटुंबीयांकडे दहा लाख रुपयांची मागणी केलेली होती. राज्य सरकार या संदर्भात काही जाब विचारणार आहे की नाही ? दीनानाथ मंगेशकर रुग्णालय सरकार ताब्यात घेणार का ? ‘ असा देखील खडा सवाल त्यांनी विचारलेला आहे .