अल्पवयीन मुलीचे अपहरण बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी याने तळोजा कारागृहात आत्महत्या केल्याची मोठी बातमी समोर आलेली असून कल्याण येथील या प्रकरणात विशाल गवळी हा आरोपी होता.
‘ विशाल गवळी याचा एन्काऊंटर करा ‘ अशी मागणी पीडित मुलीच्या कुटुंबीयांकडून केली जात होती मात्र आज पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास तळोजा कारागृहात त्याने आत्महत्या केली . अक्षय शिंदे एनकाउंटर प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवरच न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले होते त्या पार्श्वभूमीवर हा प्रकार समोर आल्यानंतर पोलीस दलात खळबळ उडाली आहे. तळोजा कारागृहात शौचालयाला जाते वेळी त्याने टॉवेलने गळफास घेतला , अशी माहिती आहे.
23 डिसेंबर रोजी आरोपी विशाल गवळी याने अल्पवयीन मुलीचे अपहरण केले आणि त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केली असा त्याच्यावर आरोप होता. अशाच पद्धतीचे अनेक गुन्हे केलेले असल्याची नोंद असून त्याला कठोर शिक्षेच्या मागणीसाठी आंदोलन देखील करण्यात आलेले होते. या पार्श्वभूमीवर चक्क तुरुंगात त्याचा मृतदेह आढळून आल्यानंतर खळबळ उडाली आहे.