नगर शहरात काढण्यात आलेल्या मिरवणुकीत माळीवाडा इथे आक्षेपार्ह मजकूर लिहिलेले फलक घेऊन नाचल्यानंतर तसेच इंस्टाग्रामवर आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याने कोतवाली पोलिसात तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , अल्तमश सलीम जरीवाला ( वय 33 वर्ष राहणार पिरशाह खुंट ) यांनी संबंधित व्यक्तींच्या विरोधात फिर्याद दिलेली असून ते मित्रांसोबत शहरातील माळीवाडा वेशीजवळ खाजगी कामानिमित्त गेले होते त्यावेळी तिथे सुरू असलेल्या मिरवणुकीत काहीजण आक्षेपार्ह मजकूर लिहिलेले बॅनर नाचवत होते सोबतच इंस्टाग्रामवर देखील अशाच पद्धतीचे स्टेटस ठेवल्याने आपल्या धार्मिक भावना दुखावलेल्या आहेत असे फिर्यादीत त्यांनी म्हटलेले आहे.
कोतवाली पोलिसात दोन समाजात धार्मिक तेढ निर्माण होईल असे कृत्य आरोपीनी केलेले दिसून आलेले असून अल्तमश जरीवाला यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर मिरवणुकीचे आयोजक दिगंबर गेंटयाळ , इंस्टाग्राम आयडी असलेला प्रथम पवार आणि सागर डांगरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.