व्यवस्थेच्या विरोधात लढता येत नाही म्हणून शरण जाणार , रणजीत कासले म्हणाला की.. 

शेअर करा

वाल्मीक कराड यांच्या एनकाउंटरची आपल्याला सुपारी मिळालेली होती असा खळबळजनक दावा करणारा वादग्रस्त पोलीस अधिकारी रणजीत कासले याने सोशल मीडियावर आपण आता शरण येणार असल्याचे सांगितलेले आहे . व्यवस्थेविरोधात लढता येत नाही त्यामुळे आपण पोलिसांना शरण जाणार आहोत , असे त्याने म्हटलेले आहे. ॲट्रॉसिटीचा गुन्हा त्याच्या विरोधात नोंदवण्यात आलेला होता. 

सायबर पोलीस ठाण्यात फौजदार म्हणून काम करत असलेला रणजीत कासले गुजरातमध्ये तपासाला गेल्यानंतर त्या ठिकाणी धमकावून पैसे मागत असल्याचा एक व्हिडिओ समोर आलेला होता त्यानंतर त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली तेव्हापासून सोशल मीडियावर तो वादग्रस्त व्हिडिओ अपलोड करत असतो. 

लातूर लोकसभा निवडणुकीच्या वेळी देखील अशाच स्वरूपाचे वक्तव्य त्याने केल्यानंतर धार्मिक भावना दुखावल्यावर त्याच्या विरोधात लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला होता. आपल्याला पकडून दाखवा माझ्याशी पंगा घेऊ नका असे आव्हान त्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना दिलेले होते त्यानंतर त्याने अखेर आपल्याला व्यवस्थेसोबत लढता येत नाही त्यामुळे मी मित्र आणि वकिलांना या संदर्भात बोललेलो आहे. परिस्थितीचा सामना मी करणार असून त्यामुळे त्यासाठी शरण येत आहे, असे म्हटलेले आहे. 

रणजीत कासले याने धनंजय मुंडे यांच्या संदर्भात देखील वक्तव्य केलेले असून आपण ज्यांच्यावर आरोप केले ते आता भाजपमध्ये प्रवेश करणार आणि भाजपच्या वॉशिंग मशीनमधून आता धनंजय मुंडे बाहेर येतील आणि बळी तर माझाच जाणार आहे. आता एक गुन्हा दाखल झाला तर आणखीही गुन्हे दाखल होतील , असे देखील त्याने व्हिडिओत म्हटलेले आहे. 


शेअर करा