राज्यपालांना प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलं आणि राज्यपाल म्हणाले ‘ जय श्रीराम ‘ 

शेअर करा

तामिळनाडूचे वादग्रस्त राज्यपाल आर एन रवी यांनी चक्क विद्यार्थ्यांना जय श्रीराम म्हणण्यास सांगितल्याने नव्या वादाला तोंड फुटलेले आहे. घटनात्मक पदावर काम करणाऱ्या व्यक्तीने अशी घोषणा देण्यास विद्यार्थ्यांना भाग पाडल्याने राज्यपाल रवी पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहेत. सुप्रीम कोर्टाने यापूर्वीच याच राज्यपालांवर घटनाबाह्य काम केल्याचा ठपका ठेवलेला होता. 

मदुराई येथील एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शनिवारी एक कार्यक्रम होता त्यात प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपालांना बोलावण्यात आलेले होते. राज्यपाल रवी यांनी स्वतःही जय श्रीराम अशी घोषणा दिली आणि विद्यार्थ्यांनाही जय श्रीराम म्हणण्यास सांगितले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अशा पद्धतीने संघ आणि भाजपची  विचारसरणी लोकांवर विद्यार्थ्यांवर लादणे अन्यायकारक आहे असा आरोप करण्यात येत आहे. 


शेअर करा