बीड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा झालेला असून संपूर्ण महाराष्ट्रात संतोष देशमुख हत्याकांडाची चर्चा झालेली असताना आजही परिस्थितीत बदल झालेला नाही. माजलगाव शहरात एका भाजप कार्यकर्त्याची अमानुषपणे हत्या करण्यात आलेली आहेउपलब्ध माहितीनुसार , बाबासाहेब आगे ( वय 30 वर्ष ) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून भाजप कार्यालयासमोरच 15 तारखेला मंगळवारी हा प्रकार घडला. अनैतिक संबंधाच्या कारणातून ही हत्या झाल्याची माहिती आहे. हत्या केल्यानंतर आरोपी नारायण शंकर फापाळ हा स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला होता.
अनैतिक संबंधातून भाजप कार्यकर्त्याची कार्यालयासमोरच हत्या , बीडची घटना
