भारतीय जनता पार्टीची मानसिकता ही मुघलांप्रमाणेच महाराष्ट्र लुटण्याची असून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख ते याच मानसिकतेतून करत आहेत अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या रायगड दौऱ्यातील भाषणावर केलेली आहे.
अमित शहा यांनी रायगड येथील कार्यक्रमात भाषण करताना छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला त्यावर आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केलेला असून,’ छत्रपतींचा एकेरी उल्लेख करणे आणि औरंगजेबाच्या कबरीला समाधी म्हणणे हा महाराष्ट्राचा अपमान आहे कारण याच महाराष्ट्राने औरंगजेबाला गाडलेले आहे ,’ असेही ते पुढे म्हणाले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाव न घेता आदित्य ठाकरे यांनी टीका करत,’ काही लोक पौर्णिमा असल्याने गावाकडे जाऊन आणले असतील त्यामुळे गावच्या भेटीनंतर जे त्यांना भेटले त्यांनी थोडी काळजी घ्यावी कारण आम्हाला त्यांचा अनुभव आहे ,’ असेही ते पुढे म्हणाले.